Top Ad 728x90

Saturday, 11 December 2021

शरद पवार, उद्धव ठाकरेंचे हृदय फक्त मुसलमानांसाठी धडकते का? - असदुद्दीन ओवैसी

 मुंबई : मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दावरून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. त्याच पार्श्वभूमीवर आज वक्फ बोर्डाच्या जमीनींना संरक्षण आणि मुस्लीम आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी घेऊन आज एमआयएमने आज औरंगाबाद ते मुंबई अशा रॅलीचं आयोजन केलं होतं. तर दुसरीकडे मुंबईत मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली होती. मुंबईत (Mumbai) जाऊन सभा घेण्याच्या आपल्या मागणीवर ठाम असल्याने एमआयमचे इम्तियाज जलील चांदिवलीकडे पोहचले आहे. असुद्दीन ओवेसींची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. ओवेसी आता काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय. दरम्यान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत,

चांदिवली सभास्थळातून live (एमआयएम सभा)

असदुद्दीन ओवैसी live - मुसलमानांना शिकायचे आहे. मात्र, त्यांना शिकता येत नाही आहे. कारण, त्यांच्याकडे पैसे नाही. मुसलमानांना आरक्षण द्या ते शिकल्याशिवाय राहणार नाही. सेक्युलॅरिझमुळे मुसलमानांना काय मिळाले. सेक्युलॅरिझमुळे आरक्षण मिळेल का? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेने हात मिळवला आहे. शिक्षित मुसलमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तरीही आरक्षण मिळालेले नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे हृदय फक्त मुसलमानांसाठी धडकते.

केव्हापर्यंत मुस्लिम धोका सहण करीत राहील. आरक्षण भेटल नाही, नाही भेटल. मुसलमानांना काहीही भेटल नाही. मुसलमानांनाही आरक्षण भेटल पाहिजे. भारताच्या संविधानात आरक्षणाबद्दल लिहिले आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुसलमान मागे असतानाही आरक्षण दिले नाही. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना आरक्षण दिले मात्र, मुसलमानांना नाही.

सरकार तिरंगेच्या विरोधात गेली आहे. तिरंगा रॅली काढली त्यात अडचण काय आहे. मुख्यमंत्री लवकरात लवकर ठीक व्हावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मिळून काम केल तर विजय आपलाच आहे. टीम वर्क म्हणून काम केल तर महाराष्ट्रातील कोपऱ्या कोपऱ्या आपण झेंडा फळकवू शकू. मी ज्यांच ज्यांच नाव घेतलं त्यांची परीक्षा सुरू होईल.

इम्तियाज जलील live - अखेर मी मुंबईत आलोच. ही फक्त सुरूवात आहे. आंदोलन बाकी आहे, रॅलीदरम्य़ान अनेकदा पोलीसांनी अडवलं. मराठी बांधवांकडून खूप शिकण्यासारखं आहे. मी मुंबईत येऊ नये यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मला अडविण्यासाठी पोलीसांवर दबाव देत आहेत. निवडणुकांपुरतीच जनतेची आठवण येते. आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहणार. राज्यकर्ते आम्हाला घाबरले आहे. तुमच्यासाठी मी लढत राहणार.

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90