मुंबई : मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दावरून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. त्याच पार्श्वभूमीवर आज वक्फ बोर्डाच्या जमीनींना संरक्षण आणि मुस्लीम आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी घेऊन आज एमआयएमने आज औरंगाबाद ते मुंबई अशा रॅलीचं आयोजन केलं होतं. तर दुसरीकडे मुंबईत मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली होती. मुंबईत (Mumbai) जाऊन सभा घेण्याच्या आपल्या मागणीवर ठाम असल्याने एमआयमचे इम्तियाज जलील चांदिवलीकडे पोहचले आहे. असुद्दीन ओवेसींची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. ओवेसी आता काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय. दरम्यान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत,
Saturday, 11 December 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment